राजकारणामध्ये कशा पद्धतीने धार्मिक मुद्द्यांचा व लोकांच्या श्रद्धेचा वापर केला जातो .....




हनुमान जी का जन्म कहां और कब हुआ?👇👇👇👇👇👇👇
मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम भक्त श्रीहनुमान यांचा जन्म पौराणिक ग्रंथ आणि ज्योतिषांच्या नुसार द्वेतायुगातील शेवटच्या कालखंडात चैत्र पौर्णिमा वार मंगळवार या दिवशी सकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी झाला होता आणि याच दिवशी संपूर्ण भारतात हनुमान जयंती देखील अगदी आनंदमय वातावरणात साजरी केली जाते. रामायणा नुसार श्रीराम यांच्या मदतीसाठी शंकर भगवान यांनी श्री हनुमान अवतार घेतला होता पौराणिक ग्रंथ शिवपुराणानुसार श्री हनुमान हे भगवान शंकर यांचे अकरावे अवतार होते श्री हनुमान यांच्या आईचे नाव अंजनी माता व वडिलांचे नाव वानर राज केशरी हे होते.

श्री हनुमान यांच्या जन्म स्थानावरून जन माणसांमध्ये काही वेगवेगळ्या भावना आहेत त्यामध्ये प्रामुख्याने तीन स्थानांवर लोकांची किंवा त्या राज्यातील हनुमान भक्तांची भावना आहे ते म्हणजे झारखंडमध्ये गुमला, महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा त्याचबरोबर कर्नाटकातील किष्किंधा,हम्पी या ठिकाणी तेथील स्थानिक लोकांच्या मते श्री हनुमानाचा जन्म झालेला आहे अशी मान्यता आहे.





झारखंड मधील गुमला जिल्ह्यामध्ये एक गुफा आहे त्याचे नाव अंजना धाम आहे. झारखंडमध्ये मानले जाते की याच ठिकाणी श्री हनुमान यांचा जन्म झालेला आहे. माता अंजनी मुळेच या गावाचे नाव अंजन हे आहे. येथे एक मंदिर आहे, जिथे बाल हनुमान माता अंजनीच्या कुशीत बसलेले आहे. त्याच ठिकाणी 365 शिवलिंग देखील आहेत. मानलं जातं की त्याच ठिकाणी माता अंजनी या भगवान शिव यांच्या पूजेसाठी येत होत्या तेथे अनेक तलाव देखील आहे. त्याच ठिकाणी एक अंजन माता मंदिर देखील आहे. मंदिराच्या खाली अत्यंत जुनी गुफा आहे त्याच गुफेला सर्प गुफा देखील म्हटले जाते. मानले जाते की माता अंजनी यांच्या एक नियम होता की त्या वर्षभरात रोज एकाच तलावात आंघोळ करायच्या एकाच बेलाच्या फांदीचे बेल घ्यायच्या आणि एकाच शिवलिंगाची पूजा करायच्या. तेथील लोकांमध्ये त्या स्थानाप्रती खूप श्रद्धा आहे व त्यांचा दावा आहे की श्री हनुमान यांचा जन्म येथेच झाला आहे.



महाराष्ट्रातील नाशिक मध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी महत्त्वाचे असणारे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी देखील एक अंजनेरी पर्वत आहे. तेथील स्थानिक लोकांच्या, ज्योतिषांच्या व पंडितांच्या मनामध्ये देखील या अंजनेरी पर्वता विषयी अतिशय धार्मिक भावना आहेत. त्यांच्या मते श्रीराम भक्त हनुमान यांचा जन्म देखील येथेच झाला आहे, असा ते दावा करतात. या ठिकाणी देखील माता अंजनीच्या सोबत असलेले बाल हनुमानाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी देखील अंजनेरी गुफा आहे. गुफेकडे जाण्याच्या मार्गाच्या सुरुवातीलाच एक भव्य श्री हनुमानाची मूर्ती ही श्री रामांच्या साधनेत असलेले आपल्याला बघायला मिळेल. या ठिकाणावरून साधारणतः तीन किलोमीटर अंतरावर अंजनेरी गुफा आहे ज्या गुफेमध्ये अंजनी मातेने 108 वर्ष भगवान शंकरांची कठोर तपस्या केली होती. विष्णुपुराण, नारद पुराण आणि शिवपुराण यामध्ये देखील या अंजनेरी गुफेचा उल्लेख केलेला आहे. असेहि सांगितले जाते या ठिकाणी हनुमानांचा जन्म झालेला आहे. त्याचबरोबर श्री हनुमानाच्या लहानपणीच्या काही आठवणी देखील या ठिकाणी असल्याचा दावा केला जातो.




र्नाटक मधील किष्किंधा येथे असलेल्या अंजनाद्री पर्वतावर देखील श्री हनुमानांचा जन्म झालेला आहे. असे मानले जाते या ठिकाणी येणाऱ्या यात्रेकरूंसाठी पर्वतावर चढण्यासाठी सुविधा उपलब्ध केल्या गेल्या आहेत. तेथील लोकांच्या मनामध्ये श्री हनुमान विषयी इतकी जास्त भावना आहे की हम्पी येथे पंधराशे मंदिरांपैकी 380 मंदिरे हे फक्त हनुमानांचेच आहेत असे मानले जाते. येथील मंदिरामध्ये रामेश्वर वरून आणलेला 25 किलोचा दगड पाण्यात तरंगताना दिसतो, सांगितले जाते की याच दगडाचा वापर करून राम सेतू बनवला गेला होता. त्याच ठिकाणी माता अंजनी चे देखील मंदिर आहे आणि माता अंजनीच्या नावावरूनच या पर्वताला अंजनाद्री पर्वत हे नाव पडलेले आहे. या ठिकाणी एक नाग गुफा देखील आहे.

राजस्थान मधील चुरू, गुजरात मधील डांग जिल्हा, हरियाणातील कैथल, आंध्रप्रदेश मध्ये तिरूमला अशा अनेक राज्यांमधून हनुमान जन्म स्थाना साठी दावा केला जातो.

वरील दाव्यांचा व तेथील लोकांच्या धार्मिक मुद्द्यांचा फायदा घेऊन अनेक राजकारणी आपल्या राजकारणातील हित साधून घेत असतात. या प्रकारचे मुद्दे राजकारणात आणून त्या ठिकाणच्या लोकांचे आकर्षण घेऊन काही राजकारणी हे यशस्वी देखील झाले आहेत. अशा प्रकारच्या मुद्द्यांद्वारे लोकांच्या भावनांशी खेळून किंवा त्या भडकवून अनेक राजकारणी आपल्या प्रचारामध्ये लोकांच्या मनात आपली व आपल्या विचारधारेची जवळीक निर्माण करतात व आपला फायदा साधून घेतात. खरंतर अशा धार्मिक मुद्द्यांना राजकारणात आणणे हे चुकीचे आहे. याने तेथील जनता व युवा पिढी ही विकासाकडून भरकटून अशा वाद विवादाच्या मुद्यांकडे एकवटली जाते व त्यातून त्यांचे आर्थिक व सामाजिक जीवनावर फार गंभीर परिणाम होत असतात, या अशा धार्मिक मुद्द्यांचा आर्थिक व सामाजिक जीवनावर होणारा परिणाम हा वर्तमानात जरी तीव्र दिसत नसला तरी तो अतिशय घातक असतो कारण तो आपापसात मोठ्या प्रमाणावर राग द्वेष निर्माण करत असतो, म्हणजेच स्लो पॉयझन सारखे तो आपले उज्वल भविष्य खराब करत असतो असेही बोलले जाते.

आता हेच उदाहरण घ्या , कर्नाटक मध्ये इलेक्शन आले असता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारादरम्यान सांगितले की श्री हनुमानाची जन्मभूमी हे कर्नाटक आहे. यातून योगी आदित्यनाथ यांना कर्नाटक मधील हनुमान भक्तांना आपल्याकडे आकर्षित करणे हे कारण असू शकते किंवा नसूही शकते, कारण अद्याप हनुमान जन्मभूमी ही कर्नाटकच आहे हे कोणीही सिद्ध केलेले नाही असेही लोक सांगतात. आणि याचे कारण एक असे आहे की कर्नाटक मध्ये खूप मोठ्या प्रमाणात श्रीहनुमानांना मानणारा वर्ग आहे. या ठिकाणी कर्नाटक मधील हम्पी येथेच जवळपास 380 मंदिरे हे फक्त श्रीहनुमानांचे आहे, असे सांगितले जाते. यावरूनच आपल्याला तेथील श्रीहनुमान भक्तांचा अंदाज येईल. त्याचबरोबर श्रीराम भक्तांना देखील यातून आकर्षित केले जाऊ शकते व अशा प्रकारे लोकांच्या धर्माचा व त्यांचा कुठल्या देवाप्रती असलेल्या श्रद्धेचा फायदा हा राजकारणी घेत असतात.
ज्याप्रमाणे योगी आदित्यनाथ यांनी कर्नाटकच्या इलेक्शन प्रचारादरम्यान येऊन सांगितले की श्रीहनुमान यांचा जन्म हा कर्नाटकचाच आहे, त्याचप्रमाणे ते महाराष्ट्रात नाशिक येथे येऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचार दरम्यान सांगतील का? की श्री हनुमानाचे जन्म स्थळ नासिक येथील अंजनगिरी पर्वत नसून त्यांचा जन्म कर्नाटक येथे झालेला आहे. किंवा झारखंड मधील गुमला या ठिकाणी प्रचार सभेत जाऊन देखील ते सांगू शकतात का की,श्री हनुमानाचा जन्म स्थळ हे झारखंड मधील गुमला येथील अंजना धाम नसून कर्नाटक येथील किष्किंधा हे आहे. हाही प्रश्न लोकांच्या मनात उत्पन्न होत आहे .

५ टिप्पण्या:

  1. या गोष्टी समाजाने जाणून घेणे खूप गरजेचे आहे

    उत्तर द्याहटवा
  2. या गोष्टी समाजाने जाणून घेणे गरजेचे आहे असे मला वाटते

    उत्तर द्याहटवा
  3. बरोबर आहे साहेब तुमचे....

    उत्तर द्याहटवा
  4. प्रत्येक लोकांनी हा विचार नक्की करायला पाहिजे तेव्हा कुठेतरी हे सगळे थांबले जाईल

    उत्तर द्याहटवा

Blogger द्वारे प्रायोजित.