उन्हाळ्यात स्किन (त्वचेची ) काळजी वाटतेय.....अशी घ्या काळजी
उष्ण हवामानात तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी कशी घ्याल?👇👇
उन्हाळ्यात स्किन ची काळजी कशी घ्यावी असा प्रश्न नेहमी सर्वांनाच पडलेला असतो. आपली त्वचा उन्हाळ्यात खराब तर होणार नाही किंवा त्वचा काळवणे, त्वचेवर काळे डाग या सारख्या समस्याबद्दल बऱ्याच लोकांना काळजी वाटत असते. हा लेख वाचल्यावर बहुतांशी बऱ्याच लोकांचे हे टेन्शन कमी होणार आहे. उन्हाळ्यात स्किन ची काळजी कशी घ्यावी याबद्दलची अगदी सोपे टिप्स आहेत ज्या आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे स्कीन बद्दलचे टेन्शन खूप काही प्रमाणात कमी होईल.
उन्हाळा सुरू झाला की स्किन बरोबरच हेल्थ प्रॉब्लेम्स होत असतात, आरोग्यासोबत त्वचेची काळजी घेणे देखील गरजेचे असते. कारण उन्हाळ्यात त्वचा काळवणे, त्वचेवर काळे डाग येणे आणि चट्टे पडणे. त्वचा तेलकट किंवा जास्त कोरडी होणे. त्वचेवर पुरळ येणे, घामोळ्या येणे अशा अनेक सौंदर्य समस्या निर्माण होतात. यासाठी त्वचेची उन्हाळ्यात योग्य ती काळजी घेण्यासाठी तुम्हाला अगदी सोपे टिप्स आहेत जे फॉलो केले पाहिजेत.
चला तर मग जाणून घेऊया कोणत्या टिप्स फॉलो करायला हव्यात.
1) प्रखर उन्हात घराबाहेर पडू नका.
उन्हाळ्यात सूर्यकिरण प्रखर असतात. अशामुळे अशा सूर्यकिरणांच्या संपर्कात आल्यामुळे तुमच्या त्वचेवर, चेहऱ्यावर काळे डाग, लालसर चट्टे असे पडू शकतात. आणि त्याचा त्रास होऊ शकतो. शिवाय उन्हामुळे त्वचा लवकर डीहायड्रेट होते, यासाठी गरज नसताना घराबाहेर उन्हामध्ये पडू नका.
हा जर काहीतरी कामानिमित्त तुम्हाला घराबाहेर पडायचं आहे तर नक्कीच तुम्ही पुढची टीप आहे ती फॉलो करून घराबाहेर पडू शकता.
2) चेहरा झाकून घ्या.
घराबाहेर पडताना चेहऱ्यावरती स्कार्फ गुंडाळा किंवा कॅप, शालगम या सारख्या पर्यायांचा वापर करा. प्रखर उन्हातील तीव्र सूर्यकिरणांचा त्वचेवर लगेच परिणाम होतो. सनस्ट्रोक टाळण्यासाठी घराबाहेर पडताना तोंडावर एखादा कॉटनचा स्कार्प तुम्ही नक्कीच गुंडाळून घेऊ शकता, ज्यामुळे तुमच्या त्वचेवर थेट सूर्यकिरण पडणार नाही आणि हो लक्षात ठेवा की पर्यायांचा वापर ते नेहमी हलक्या रंगाचे व वजनाचे असायला हवे त्यामुळे तुम्ही जास्त आरामदायक सुद्धा राहू शकाल.
3) घराबाहेर पडताना सनस्क्रीन नक्कीच लावा.
उन्हाळ्यात मी कोणती स्किनकेअर वापरावी?खरंतर कोणत्याही ऋतूमध्ये घरातून बाहेर पडताना सनस्क्रीन लावणे फार गरजेचे असते कारण सनस्क्रीन लोशन लावल्याने सूर्यकिरणांचा त्वचेची थेट संपर्क येत नाही. मात्र लक्षात ठेवा उन्हाळ्यात नेहमी चांगल्या कंपनीचे आणि एसपीएफ थर्टी पेक्षा जास्त एसपीएफ असलेले सन स्क्रीन लोशन लावावेत. घराबाहेर पडण्याच्या अगोदर कमीत कमी 15 ते 20 मिनिटं आधीच सनस्क्रीन लावावेत आणि मगच घराच्या बाहेर पडावे.
4) जर आपण महिला असेल तर.
जर आपण महिला असेल तर नेहमी लक्षात ठेवा उन्हाळ्यामध्ये जास्त मेकअप करू नये. उन्हाळ्यात खूप जास्त किंवा मोठ्या प्रमाणात मेकअप करणं हे टाळायला हवे. कारण बऱ्याच वेळा उन्हाळ्यात खूप घाम येत असतो, आणि घामामुळे मोकळ्या झालेल्या त्वचेच्या मोकळ्या छिद्र्यांमध्ये मेकअपचा थर जाऊन बसलेला असतो. यामुळे काय होते कि त्वचेच्या आतील भागाचा संपर्क हे केमिकल युक्त मेकअपच्या थरासोबत होतो आणि त्यामुळे त्वचा आणि त्याच्या संबंधित काही समस्या उद्भवू शकतात. म्हणजे काय पिंपल्स येणे, डार्क स्पॉट राहणे अश्या समस्या तुम्हाला निर्माण होऊ शकतात.
5) उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी पिण्याचे आवश्यकता असते.
शरीर हायड्रेट राहण्यासाठी शरीराला पुरेशा प्रमाणात पाण्याची गरज असते. उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामध्ये शरीराचे तापमान कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी शरीरातून भरपूर प्रमाणात घाम बाहेर पडत असतो, त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी अनियंत्रित होऊन जाते. उन्हाळ्यात पुरेशा प्रमाणात पाणी न पिल्याने तुमच्या शरीर व त्वचा लवकर डीहायड्रेट होते. कोरड्या त्वचेमुळे अनेक त्वचा समस्या निर्माण होऊ शकतात. शिवाय ड्रीहायड्रेशनमुळे तुम्हाला उष्मघाताचा सुद्धा त्रास होऊ शकतो. यासाठी उन्हाळ्यात शरीर आणि त्वचा दोन्ही गोष्टींची काळजी घेण्यासाठी सतत थोडं थोडं पाणी पिणे गरजेचे आहे. त्यामुळे त्वचा नितळ आणि चमकदार दिसेल.
6) पाणी प्या आणि बरोबर खा
उन्हाळ्यात दररोज नारळ पाणी, लिंबू पाणी किंवा कोकम सरबत, आवळा सरबत, ताक पुदिना युक्त मठ्ठा किंवा इतर कोणतेही फळांचा रस नक्की तुम्ही तुमच्या आहारामध्ये मध्ये समाविष्ट करू शकता . यामुळे उन्हाळ्यात तुमची स्किन नेहमी हायड्रेट राहण्यास मदत मिळेल.
तर अशा पद्धतीने उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकतो.
ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच इतरांपर्यंत पोहोचवा व सर्वांना उन्हाळ्याच्या या त्रासातून मुक्त करा धन्यवाद..
Mast
उत्तर द्याहटवाMast
उत्तर द्याहटवा