काय आहे खऱ्या धर्माची परिकल्पना ?? चला जाणून घेऊया......

धर्म धर्माच्या आज वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होतात, परंतु खरा धर्म काय ? काय आहे खऱ्या धर्माची परिकल्पना ......??







या विषयावर लोकांना एक दुसऱ्यांकडून ऐकूनच समजलं जातं. खऱ्या धर्माच्या परिभाषा ह्या असतील असं लोक मानतात, परंतु त्या जाणत नाही. दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून आपण ते खरं मानलं असं नेहमीच होत आलेले आहे, परंतु जर तुम्ही कोणत्याही धर्माचा अभ्यास केला तर तुम्हाला जाणवेल धर्म या शब्दाचा अर्थ होतो सत्य आणि प्रत्येक धर्म हा सत्यावरतीच मोठा झालेला आहे.

प्रत्येक धर्माचे मूळ हे एकच आहे. त्यामध्ये रागमुक्त, द्वेषमुक्त, लोभमुक्त जीवन व शुद्धतापूर्वक कर्मयुक्त,"जो माणूस जगत असतो , तोच खरा धर्माचा भक्त असतो" असं मूळ हे प्रत्येक धर्माचा असल्याचा आपल्याला जाणवेल. परंतु आज प्रत्येकामध्ये वेगवेगळे धर्म लोकांनी गोंदवलेले आहेत. ज्याच्यामध्ये एक दुसऱ्याच्या धर्माविषयी राग द्वेष लोभ युक्त वातावरण निर्माण केले जात आहे. व शुद्धतापूर्वक कर्मापासून अशा पद्धतीने लोक वेगळ्या कर्मांवरती चालत आहेत किंवा जात आहेत. एक दुसऱ्याविषयी मनात राग द्वेष आपण जर ठेवत असाल तर आपण कोणत्याही धर्माचा अभ्यास केलेला नाही किंवा कोणत्याही धर्माच्या परिकल्पनेनुसार आपण चालत नाही हे सत्य आहे, परंतु हे समजण्यासाठी आपल्याला आपण ज्या धर्माचे पालन करतो त्या धर्माविषयी अभ्यास करून जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे ना की कोणाच्या ऐकण्यावरून किंवा सांगण्यावरून आपण आपल्या धर्माला मानून लोकांच्या आदेशानुसार काम करणे हे चुकीच आहे.

यातून आपल्याला हेच समजते की रागमुक्त, द्वेषमुक्त, लोभमुक्त व शुद्धतापूर्वक कर्मयुक्त जो जीवन जगतो तोच खरा धर्माचा भक्त........


1 टिप्पणी:

  1. खूप सुंदर विचार आहे अशा विचाराची महाराष्ट्र राज्याला व देशाला व देशातील जनतेला गरज आहे

    उत्तर द्याहटवा

Blogger द्वारे प्रायोजित.