चक्क व्हॉट्सॲपवर मेसेज एडिट करता येणार... जाणून घ्या नवीन फिचरबद्दल


आता आम्ही व्हाट्सॲप वापरणाऱ्या लोकांसाठी एक महत्वाची आणि खूप चांगली बातमी घेऊन आलो आहोत. व्हाट्सअप ॲपकडून आपल्या युजर्ससाठी नेहमीच काहीतरी नवीन फिचर्स घेऊन येत असते.त्यामुळेच या ॲपचा वापर दिवसेंदिवस जास्त असतांना पाहायला मिळतो. तसेच हे ॲप युजरफ्रेंडली कसे रााहिल, याचा नेहमीच कंपनीकडून विचार केला जातो. आता तर व्हॉट्सॲप लवकरच एक नवीन फिचर्स घेऊन येणार आहे, जे व्हॉट्सॲप युजर्ससाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. काय आहे हे नवीन फिचर चला जाणून घेऊया 👇👇👇.....







आपण आता पर्यंत व्हॉट्सॲपवर समोरच्याला एखादा चुकीचा मेसेज पाठवलेला तर तो मेसेज नंतर डिलिट करत होतो. पण आता या नवीन फिचर मध्ये तो मसेंज डिलीट न करता ए़डिट करण्याची सुविधा मिळणार आहे.👏👏👏👏👏 .यामुळे युजर्सना मेसेज एडिट आणि तो सेव्ह करण्याचा एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. याशिवाय युजर्सना व्हॉट्सॲपवर आपले contact सेव्ह आणि एडिट करण्यासाठी या फिचर्सचा चांगला उपयोग होणार आहे. व्हॉट्सॲपच्या बीटा व्हर्जनवर या फिचरची चाचणी सध्या सुरू आहे आणि लवकरच सगळ्या युजर्ससाठी हे फिचर उपलब्ध होणार आहे.


हे आहे नवीन व्हॉट्सॲप फिचर.....

सध्या व्हॉट्सॲपमध्ये समोरच्याला पाठवलेला मेसेज डिलिट करण्यासाठी मेसेज सिलेक्ट करून Delete For Everyone हा पर्याय उपलब्ध आहे. यामुळे दोन्ही बाजूने पूर्ण मेसेज डिलिट होतो. पण या नवीन फिचरमुळे तोच मेसेज एडिट करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या फिचर्समुळे युजर्सकडून समोरच्याला पाठवलेला मेसेज डिलिट करायची आवश्यकता नाही. आपल्याकडून पाठवण्यात आलेल्या मेसेजमधील नको असलेले शब्द किंवा एखादे वाक्य आपल्याला डिलिट किंवा एडीट येणार आहेत. युजर्सने पाठवलेला मेसेज हा एका ठराविक वेळेच्या आतमध्ये आपल्याला एडिट करावा लागणार आहे. यासाठी युजर्सने पाठवलेला मेसेज १५ मिनिटाच्या आत एडिट करता येण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हे वॉट्सअप फिचरही व्हॉट्सॲप युजर्सना मोठ्या प्रमाणात पसंत पडणार आहे.

ही सर्व प्रकिया व्हॉट्सॲपवर सेंड करण्यात आलेल्या मेसेजशी संबंधित असणार आहे. या फिचरमुळे युजर्सना त्यांचा मेसेज ए़डिट तसेच सेव्ह करता येणार आहे. आपण आपल्या नातेवाईकांना,आई-वडिलांना, मित्र-मैत्रिणींन किंवा शिक्षकांना अनावधानाने चुकीचा मेसेज सेंड करतो. हा चुकीचा मेसेज समोरच्याला गेल्यामुळे बहुतांशी आपल्यातील लोकांची कधी ना कधी तारांबळ उडाली असणार. तसेच मेसेज पाठवण्यामागील हेतू चांगला जरी असला तरी काही वेळा काही शब्दांमुळे गैरसमज निर्माण होत असतात. समोरच्याला कितीही स्पष्टीकरण दिले तरी गैरसमज दूर होत नाही. या नवीन फिचरमुळे व्हॉट्सॲपवर पाठवलेले मेसेज डिलिट न करता त्यातील शब्द एडिट करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे यामुळे झालेली चुक दुरूस्त करण्याची संधी व्हॉट्सॲप आपल्या युजर्सना उपलब्ध करून देणार आहे, पण यासाठी युजर्सना काही काळ वाट पाहावी लागणार आहे. याचे कारण सध्या या नवीन फिचरवर काम चालु आहे व प्रगतीपथावर आहे. हे नवीन फिचर सध्या प्राथमिक अवस्थेत असून युजर्सना कधी उपलब्ध होईल याची माहित अद्याप देण्यात आलेली नाही.

२ टिप्पण्या:

Blogger द्वारे प्रायोजित.