या आहेत ५ लाखांपेक्षा कमी किमतीतील कार...स्वस्तात एकदम मस्त .......

 

 आज एक छोटीशी फॅमिली कार असावी असं सर्वांनाच वाटते, पण प्रत्येक वेळेस प्रश्न असतो तो फक्त बजेटचा म्हणूनच आपण आज बघणार आहोत पाच अशा कार ज्या मायलेज च्या बाबतीत तर सरस आहेच पण बजेटमध्ये बसणाऱ्या देखील आहेत चला तर आज पाच लाखांपेक्षा कमी किमतीत असणाऱ्या कोणत्या कार बाजारत उपलब्ध आहेत .

बेस्ट फॅमिली कार किंमत पाच लाखांच्या आत

  • मारुती सुझुकी अल्टो (३.५४ ते ५ लाख) - सर्वात प्रथम आहे आपल्या सर्वांची आवडती अशी मारुती अल्टो..

मारुती सुझुकी अल्टो कार ही पाच वेरेंटमध्ये उपलब्ध आहे यामध्ये तुम्हाला ७९६ सीसी तीन सिलेंडर इंजिन मिळते जे ६००० आरपीएम वर ४७ एचपी पावर आणि तीन हजार पाचशे आरपीएम वर ६९ न्यूटन मीटर चा जनरेट करते आणि ही कार एक लिटर पेट्रोलमध्ये २२.०६ किलोमीटर चे मायलेज देते आणि सीएनजी ३१ किलोमीटर प्रती किलो चे मायलेज देते.

  • मारुती सुझुकी सेलेरिओ (५ ते ७.१३ लाख ) - ही कार आठ व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे या कारमध्ये ९९८ सीसी बीएससी इंजिन आहे जे ३५०० आरपीएम वर ९० न्यूटन मीटर चा पीकॉक जनरेट करते ही कार एक लिटर पेट्रोलमध्ये २४.२५ किलोमीटर मायलेज देते आणि सीएनजी ३५.६ किलोमीटर प्रती किलो चे मायलेज देते.

  •  मारुती एस प्रेसो (४.२५ ते ६.१० लाख )- ही कार आठ वेरेंटमध्ये येते, या कारमध्ये ९९८ सीसी तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे जे ५५०० आरपीएम वर ६७ बी एच पी ची पावर आणि ३५०० आरपीएम वर ९० न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करते. ही कार एक लिटर पेट्रोलमध्ये २४.१३ किलोमीटरचे मायलेज देते आणि सीएनजी ३२.७३ किलोमीटर प्रती किलोची मायलेज देते.

 

  • डॅटसन रेडी गो (३.८४ ते ४.९६ लाख) - ही कार आठ लिटर आणि एक लिटर पेट्रोल इंजिन मध्ये येते. आठ लिटरचे इंजिन ५३ एचपी मध्ये तर एक लिटर इंजिन ६७ एचपी पावर जनरेटर करते ही कार एक लिटर पेट्रोलमध्ये २०.७१ किलोमीटर चे मायलेज देते.

 

  • मारुती इको कार (५ ते ६.५३ लाख) - ही कार चार  व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे, पेट्रोल इंजिन मध्ये येणारी ही कार एक लिटर पेट्रोलमध्ये १९.७१  किलोमीटरचे मायलेज देते आणि सीएनजी २६.७८  किलोमीटर प्रती किलो चे मायलेज देते.

  • ह्युंदाई सँट्रो (४.५७ ते ५ लाख)-  इतर कार प्रमाणे ह्युंदाईची सँट्रो सुद्धा 5 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारी कार आहे. हि कार आपल्याल १.१  लीटर इंजिन व्हेरियंट मिळते जे ६९ पीएसचे पॉवर देते. स्पीड मॅन्यूअल आणि एएमटी गियरबॉक्सचे ऑप्शन या कार मध्ये पाहायला मिळते.


माहिती आवडल्यास नक्की share करा आणि आम्हाला facebook page ला फोलो करायला विसरू नका... धन्यवाद 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.