पॅन कार्डधारकांना भरावा लागेल 10,000 रुपये दंड ! जाणून घ्या अपडेट्स....
पॅन कार्डधारकांसाठी सरकारने आता एक मोठी घोषणा केली आहे. तुम्ही देखील जर पॅनकार्ड बनवले असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे...
सरकारने पॅन कार्ड -आधार कार्ड लिंकसंबंधी एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे सगळे हैराण झाले आहे.
सरकारने आधार कार्डसोबत पॅन लिंक करण्याच्या तारखेत वाढ केली आहे, त्यामुळे लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र या तारखेपर्यंत हे काम पूर्ण करणे गरजेचे आहे, न केल्यास तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागेल. जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचणे महत्त्वाचे आहे.
पॅन कार्डधारकांवर ही मोठी कारवाई होणार...
जर तुम्ही नवीन पॅन कार्ड बनवले असेल आणि तुम्ही ते आधार कार्डशी लिंक केलेले नसेल तर बातमी तुमच्यासाठीच आहे. प्राप्तिकर विभागाने (Income Tax) यासाठी अंतिम तारीख निश्चित केली आहे. 30 जून 2023 पर्यंत तुम्हाला तुमचे आधारकार्ड पॅनकार्ड सोबत लिंक करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. 31 जूनपर्यंत हे काम न केल्यास 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. एवढेच नाही तर 1 जुलै,2023 पासून तुमची संबंधित सर्व कामे बंद पडतील. तुम्ही कोणतेही काम करू शकणार नाही. एवढेच नाही तर तुमचे पॅन कार्ड देखील निष्क्रिय केले जाईल, त्यामुळे नागरिकांना मोठा फटका सहन करावा लागणार आहे.
ही तारीख आधी निश्चित करण्यात आली होती.
या आधीच आयकर विभागाने, पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक करण्याची तारीख वाढवली होती. यापूर्वी 31 मार्च 2023 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती व त्यानंतर दंड आकारण्याचे आदेश जारी करण्यात आले होते, परंतु आता आयकर विभागाने यात बदल करून तारीख वाढवून लोकांना नक्कीच दिलासा दिला आहे.
जर तुम्ही पॅनकार्डधारक असाल व तुमचे आधारकार्ड जर पॅनकार्ड सोबत लिंक नसेल तर तुम्ही ते लवकरात लवकर पूर्ण करून लागणारा दंड वाचवू शकता.
माहिती उपयुक असल्यास आमच्या Graduate Titan या Facebook page ला फोलो करा व नवनवीन अपडेट मिळवत राहा...
Post a Comment